धुळे । सप्तश्रुंगी गडावर जाणार्या एरंडोल येथील जोहरी कुटूंबियांच्या गाडीला दि.2 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पारोळ्याजवळ जळगावकडे जाणार्या क्रुझर गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात दोन बालकांसह पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांना उपचारार्थ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. वणी येथील सप्तश्रुंगी देवीच्या यात्रेत दरवर्षी जोहरी कुटूंबिय व्यवसायानिमीत्त जातात. रविवारी दुपारी 4 वाजता एरंडोल येथील जोहरी कुटूंबिय गाडी क्रं.एमएच 19 बीएम 5237 छोटा टॅम्पोने गडावर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान पाच वाजेच्या सुमारस राष्ट्रीय महामार्ग क्र 6 पारोळा जवळ समोरून येणार्या एमएच 19 सीएफ 5486 क्रुझर गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे टॅम्पो पलटी होवून टॅम्पोमधील जोहरी कुटूंबियामध्ये दोन बालकांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चंदनसिंग अवतार जोहरी,लक्ष्मीबाई अवतार जोहरी यांना अतीमार लागल्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. तर क्रुझरचा अज्ञात चालक मात्र या अपघातानंतर गाडी रोडाच्या कडेला सोडून पसार झाला.
मदतीला पारोळ्याचे माजी आमदार सरसावले
अपघातानंतर जाट कुटूंबिय तब्बल अर्धा तास रोडावर पडून होते. परंतू त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. यावेळी पारोळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर पाटील हे जळगावहुन पारोळ्याकडे जात असतांना अपघातग्रस्तांना पाहुन थांबले व तात्काळ रूग्नवाहीकेस बोलावून जखमींना जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात रवाना केले. यावेळी महामार्गावर गाड्यांची मोठी रांग लागल्यामुळे वाहतूकीस अडचण झाली होती. आ.पाटलांनी तात्काळ पारोळा पोलीसांना फोन करून पाचारण केल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
गाडीमधुन किंमती वस्तू लांबवील्या
अपघातानंतर क्रुझर चालक गाडी सोडून पसार झाल्यामुळे रस्त्यावरून येणार्या जाणार्या लोकांनी क्रुझर मधील किंमती वस्तू काढण्यासाठी झुंबड उडाली होती. हाती लागेल ते बॅटरी,स्पिकर,टेप लोकांनी काढून नेले.