सफाई कर्मचारी आयोगाची ‘पीएमओ’कडे तक्रार

0

पिंपरी : भोसरीतील एका सफाई कर्मचार्‍याचा नाला साफसफाई करताना मृत्यू झाला होता. मात्र, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने संबंधित कर्मचारी दुसर्‍या जातीचा असल्याचे सांगत मदतीसाठी नकार दिला होता, असा आरोप करत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी सफाई कर्मचारी आयोगाची पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर लेखी तक्रार केली आहे.

विजेच्या धक्क्याने मृत्यू
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी सफाई कर्मचारी बाळू भगवान सोनवणे यांचा नाला सफाई करताना विजेचा धक्का लागून 30 जून रोजी मृत्यू झाला. या कर्मचार्‍याच्या कुटुंबाला महापालिकेकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांच्याकडे अ‍ॅड. सागर चरण यांनी मागणी केली. परंतु, पवार यांनी सोनवणे हे कर्मचारी दुसर्‍या जातीचे आहेत. त्यांना मदत करता येणार नसल्याचे सांगितले, असा आरोप चरण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे.