सफाई कर्मचार्‍यांबद्दल निष्काळजीपणा; आयुक्तांना नोटीस

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका सफाई कर्मचार्‍यांच्या बाबतीत निष्काळजीपणे केल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. कर्मचार्‍यांच्या बाबतीत महापालिका निष्काळजीपणे वागत आहे, अशी तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभाग, तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना 14 डिसेंबरला नोटीस पाठविली आहे. चरण यांनी 11 डिसेंबर रोजी आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत या प्रकरणी खुलासा करावा असे या नोटीसीत महाराष्ट्राच्या मुख्यसचिवांना बजावण्यात आले आहे. तसेच वेळेत खुलासा न केल्यास अनुसूचित जाती आयोग त्यांना मुख्यसचिवांना व्यक्तिश: अथवा प्रतिनिधी मार्फत हजर राहण्यास समन्स जारी करू शकेल, असे या नोटीसीत म्हटले आहे.