सफाई कामगारांच्या लढ्यात कन्हैया कुमारची उडी

0

मुंबई : समान कामास समान वेतन द्या, अशी मागणी करीत कन्हैया कुमार याने राज्यातील सफाई कामगारांच्या लढाईत उडी घेतली आहे. राज्यात आणि देशात असलेले बीजेपी सरकार हे फक्त बोलबच्चन सरकार असल्याचा हल्लाबोल कन्हैया कुमार यांनी कंत्राटी सफाई कामगारांच्या आझाद मैदान येथील कामबंद आंदोलनात बोलतांना केला. हे सरकार देशाला गुलामगिरीकडे नेत असल्याची टीका त्याने यावेळी केली. कन्हैयाकुमारच्या भाषणावेळी कामागारांच्या घोषणाबाजीने आझाद मैदान दणाणले. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील साडेसात तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2015 रोजी जाहीर केलेले किमानवेतन अद्याप दिले जात नाही. महानगरपालिका व नगरपालिकामध्ये काम करणार्‍या तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन दिले जात नाही तो पर्यंत हा लढा सुरु राहील, असे कचरा वाहतूक श्रमिक संघाचे मिलिंद रानडे यांनी सांगितले.