सफाई कामगारांच्या वारसांना मिळाले नियुक्तीपत्र

0

नगराध्यक्ष रमण भोळे यांचे कुटुंबियांनी मानले आभार

भुसावळ – लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काप्रमाणे सफाई कामगारांच्या पाच वारसांना मंगळवारी पालिकेत नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सफाई कामगारांच्या वारसांना न्याय मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पालिका प्रशासन व नगराध्यक्षांचे आभार मानले आहे. मंगळवारी पालिकेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अजय बलराम करोसिया, इमरतलाल किसन करोसिया, राजा जुम्मन गोहर, शुभम सुरेश बटाणे, शकुन जगदीश पथरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रसंगी अ‍ॅड.बोधराज चौधरी, नगरसेविका सोनी बारसे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक संतोष बारसे, नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे, मनमोहन घारू, शंकर करोसिया, गिरीश महाजन आदींची उपस्थिती होती.