जळगाव । सोमवार 29 मे रोजी आरोग्य विभागातील सफाई कर्मचार्यांवर अज्ञात व्यक्तीने मारहाण करण्याची घटना घडली होती. तांबापुरा, शिरसोली नाका, आरोग्य युनिट क्र 10 येथे दुपारी 1.30 वाजता सफाई कामगार दिपक पुरण चांगरे हे कामसंपवून थंब करण्यासाठी आले होते. यानंतर चांगरे हे झाडाच्या सावलीत उभे असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला चढवून मारहणा केली.
युनिट क्र.10 येथे सफाई कामगारास मारहाण
यामारहाणीचा निषेध अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. सफाई कर्मचार्यांना काम संपल्यानंतर फिल्डवरून 2 ते 3 किलोमीटर परत युनीट ऑफीसला येवून थंब करावा लागतो. संघातर्फे दुपारचे थंब बंद करण्याची मागणी केली आहे. यामारहाणीविरोधात एमआयडीसी पोलीसांत संघातर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्षांनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना कळविले तसेच डॉ. पाटील यांना पोलीस स्टेशनला उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र, आरोग्य अधिकारी पोलीस स्टेशनला आले नसल्याने त्यांचा निषेध संघातर्फे करण्यात आला. सफाई कामगारांना संरक्षण द्यावे अन्यथा होणार्या परिणामांना प्रशासन व आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात देण्यात आला आहे.