चाळीसगाव । सफाई कामगारांना विविध सुविधा पुरविल्या जाव्यात सफाई कामगार हा शहराच्या आरोग्याचे रक्षण करणारा एक सैनिक असून जनतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तो सदैव कार्यरत असतो. हा वर्ग स्वच्छता करून विविध आजारांपासून जनतेचे संरक्षण करीत असतो आणि म्हणून जनतेने सुद्धा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. सतत कचर्याशी संपर्क येत असल्यामुळे या कामगारांना नियमित आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागतो, म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांनी या सफाई कामगारांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांचेसाठी आरोग्य शिबिरे राबविणे तसेच त्यांना गमबुट, हातमोजे, मास्क, गणवेश, साबण असे संरक्षक साहित्य पुरवले जावेत तसेच घंटा गाड्यांवर करणार्या सफाई कामगारांना देखील वरील प्रमाणे सुविधा देण्याची तंबी घंटागाडी ठेकेदारास द्यावी.
संभाजी सेनेने या केल्यात मागण्या
कामगारांना संभाजी सेनेने मागणी केलेल्या सुविधा तात्काळ पुरविण्यात याव्यात आणि आमच्या मागण्यांबाबत आपण घेतलेल्या निर्णया बाबतचे पत्र आम्हाला आम्हाला द्यावे आम्ही आपल्या पत्राची वाट 21 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाहू असे कोणतेही पत्र आम्हास न दिल्यास 22 फेब्रुवारी 2018 रोजी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी सैनिक दिवसभर नगरपरिषद आवारामध्ये आंदोलन करतील प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणार्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण व आपले शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
निवेदनावर संभाजी सेना तालुकाध्यक्ष गिरीष पाटील, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाजन, शहराध्यक्ष अविनाश काकडे, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे, तालुका सचिव दिवाकर महाले, संदिप जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश जोशी, रविंद्र शिनकर, रवींद्र बोरसे, समाधान पाटील, संदीप जाधव, सुरेश पाटील, मिलिंद पाटील, भरत आहीरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.