सफाई कामगारांनी बेमुदत उपोषण सोडले

0

जळगाव । जिल्हा परिषद सफाई कामगारांचे प्रंलबित मागणी संदर्भात तक्रार निवारण सभेत चर्चा करण्यात आली होती. परंतु तीन महिने होवून सफाई कर्मचार्‍यांच्या मागणी कडे प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने, अंत्योद्य कामगार परिषद व कर्मचार्‍यांतर्फे जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी मागणींबाबत सकारात्मक भुमिका घेतली जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मनोज खरारे, जिल्हा सचिव किशोर जावे, प्रदेश सचिव राजेश गोयर, राज्य उपाध्यक्षा प्रतिभा सुर्वे, मंगेश बाविस्कर, अरुण बडेवाल, चदंन करोरीया, पिंटू तेजकर, बाळू अडकमोल, अरुण बोदडे आदींनी उपोषण केल.

सफाई कर्मचार्‍यांनी 4 वेळेस उपोषणाचा पवित्रा घेतला परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. दलित मेहतर सामाजाला व मागसवर्गीय कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा. यात वारसाहक्कने नोकरी मिळणेसाठी मनोज खरारे, अरुण भेंडवाल, चंदर करोसिया किशोर सोंलकी कलाबाई सपकाळे, याचे वारसाला लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी देण्याचे प्रस्ताव 1 ऑगस्ट 2017 पासुन पाठविलेल आहेत. सदर प्रस्ताव 30 दिवसाच्या आत निकाली काढुन त्यांना आदेश देण्यात यावे. शासनाचे 21 ऑक्टरबर 2011 रोजी आदेश काढण्यात आले होते.