सबगव्हाण सरपंचावर प्राणघातक हल्ला

0

अमळनेर – तालुक्यातील सबगव्हाण येथील सरपंच नरेंद्र बाळु पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र बाळू पाटील हे ग्रामपंचायत कार्यालया समोर उभे असता गावातील संजय पितांबर पाटील हा आला व तो ग्रामस्थांना शिवीगाळ करीत होता. तेव्हा त्याने सरपंच नरेंद्र पाटील यांच्या मोटारसायकल लाथ मारून पाडली त्यास या बाबत जाब विचारता असता आरोपी त्याचा राग येवुन सरपंच यास शिवीगाळ करून मारण्याचा दम दिला. तसेच त्याच्या हातातील आडजात काठीने उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारली तेव्हा परिसरातील उपस्थित नागरिक वासुदेव पाटील, श्रीराम पाटील ,नितीन पाटील,लीलाधर पाटील,यांनी मला त्याच्या तावडीतून सोडले. गुडघ्याजवळ मार बसल्याने मी उपचार्‍या ग्रामीण रुग्णालयात अंमळनेर येथे गेलो तपासणी केली असता गुडघ्याचे हाड फॅक्चर झाल्याने सांगण्यात आले. याबाबत हल्ला प्रकरणी सरपंच नरेंद्र बाळू पाटील यांनी 23 रोजी मारवड पोलीस स्टेशन ला भाग-5 गु.र.न.15/2015 भा.द.वि.कलम 325, 323, 504, 506 प्रमाणे स्टेशन नोंद करण्यात येऊन पुढील तपास मारवड पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.चव्हाण हे करीत आहेत.