‘सभागृहात गैरहजर रहा’; लालूंचा तुरुंगातून भाजप आमदारांना फोन

0

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू आघाडीला बहुमत मिळाले आहे. नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. आज बुधवारी २५ रोजी बिहार विधानसभेचे अधिवेशन होत आहे, यात नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विधानसभेत मतदान सुरूं आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री सध्या तुरुंगात असलेले लालू प्रसाद यादव यांनी भाजपच्या आमदारांना फोन करून “तुम्ही सभागृहात उपस्थित राहू नका” असे सांगत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकाराने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भाजप आमदारांना सभागृहात हजर राहू नका, त्याबदल्यात तुम्हाला मंत्रीपद देतो’ असे लालू प्रसाद यादव सांगत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान भाजपने लालू प्रसाद यादव यांना तिहार तुरुंगात पाठविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

तुरुंगात असतांना लालू प्रसाद यादव यांच्याकडे फोन आला कसा? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.