जळगाव। जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड 1 एप्रिल रोजी करण्यात आली. यावेळी दोन विषय समितींचे सभापतींना पद वाटप करण्यात आले. उर्वरीत समिती सभापती व सदस्यांची निवड महिन्याभरानंतर जाहीर करण्यात आली. दरम्यान उपाध्यक्ष यांच्याकडे असलेल्या बांधकाम समिती पद काढून या समितीवर अगोदर महिला बालकल्याण समिती सभापती असलेल्या रजनी चव्हाण यांची निवड करण्यात आली असल्याने ही निवड अवैधरित्या करण्यात आली असल्याची नाराजी खुद्द भाजपातील काही सदस्यांनी व्यक्त केली आहे. जवळपास 40 दिवसानंतरही जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती आणि सदस्य यांना अधिकृत समिती देण्यात आली नाही. कारण निवडीसंदर्भातील इतिवृत्त अद्यापही प्रसिध्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे कुढल्या सदस्यांची कोणत्या समितीवर सभापती किंवा सदस्य म्हणून निवड झाली आहे हे कळायला मार्ग नसल्याची चित्र दिसून येत आहे.
दोन दिवसात इतिवृत्त प्रसिध्द होणार जिल्हा परिषद विषय समिती सभापती, सदस्य निवडीला भाजपाशतील पक्षांतर्गत वादामळे ग्रहण लागल्याचे आजपर्यतच्या घडामोडीवरुन दिसून आले आहे. पक्षांतर्गत वाद उद्भवू नये यासाठी भाजपाच्या पदाधिकार्यांनी चाचपणी केली, त्यानंतरच समिती निवड करण्यात आली आहे. दरम्यान महिन्याभरानंतर सदस्य निवड करण्यात आले. मात्र अद्यापही निवड करण्यात आलेले सभापती तसेच सदस्य हे अधिकृत नाही. येत्या दोन दिवसात निवडीसंदर्भातील इतिवृत्त प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अधिकृत पद निश्चित होणार आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पट संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्यांची चिंता व्यक्त करण्यात येऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची आदेश देण्यात आले. जिल्ह्याभरातील शाळांमध्ये सौर पॅनल बसविण्यासाठी शिक्षण विभागाला सांगण्यात आले. शाळेला विजपुरवठ्या बाबात माहिती घेण्यात आली. आमदार, खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तेवर भर देणे, शिक्षणाधिकार्यांनी दत्तक गावांना भेट द्यावी अशी सुचनाही देण्यात आले.
अधिकृत शिक्कामोर्तब नाही
जिल्हा परिषदच्या एकुण दहा विषय समिती असतात. या विषय समितीत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सामावुन घेतले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती वगळता सर्वांना समितीत सदस्यपद मिळणार आहे. यात पंचायत समिती सभापतींचाही समावेश आहे. जो पर्यत समित्यांबाबतचे इतिवृत्त अंतिम होत नाही तोपर्यत कोणताही सभापती किंवा सदस्य अधिकृत होणार नाही. इतिवृत्त प्रसिध्दीनंतर पदावर शिक्कामार्तब होणार आहे.