एरंडोल । तालुक्यात शिवसेनेच्या सभासदांची विक्रमी नोंदणी करून पक्ष संघटन मजबूत करा आणि तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे विरोधकांना दाखवून द्या असे आवाहन आजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले. तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी शेतकर्यांच्या कृषीमालाला हमी भाव मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या भगव्या सप्ताहानिमित प्रत्येक पदाधिकार्याने जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे सभासदांच्या नोंदणीवरून विरोधकांना दाखवून द्या असे सांगितले. मेळाव्यास भगव्या साप्ताह निमित्त शेतकर्यांना कर्ज माफी मिळावी या मागणीचे तहसीलदारांना निवेदन देणे, पिक कर्ज मिळणे बाबत निवेदन देणे, प्रत्येक गटात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून चर्चा करणे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्यास उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हापरिषद सदस्य नाना महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख बबलु पाटील, माजी सभापती मोहन सोनवणे, पंचायत समिती सदस्य अनिल महाजन, तालुका संघटक सुनील मानुधने, विजय ठाकूर, प्रमोद महाजन, चिंतामण पाटील, सुनील चौधरी, जळूचे सरपंच रवींद्र जाधव, तालुका उपप्रमुख रवी चौधरी आदी उपस्थित होते.