सभासद हाच असतो पतसंस्थेचा खरा मालक!

0

शहादा। सभासद हाच पतसंस्थेचा खरा मालक आहे. ही संस्थाचे सुरवातीला लहानसे रोपटे होते. त्या पतसंस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. ते सभासदांच्या अथक परीश्रमातूनच ही पतसंस्था सभासदंचे सुख- दुख व हित जोपासनारी संस्था असून आता दोन हजार प्रासंगिक कर्ज देणारी ही संस्था आज सात लाख पंन्नास हजार कर्ज देण्यास सक्षम झाली आहे याचे श्रेय सभासद व ठेविदारांना जाते असे असे प्रतिपादन पतसंस्थेचे गट नेते प्रा. दत्तात्रेय शिंदे यांनी केले. ते दोडाईचा येशील सौरभ मंगल कार्यालयात धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक -शिक्षकेतर सेवकांची पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

सभासदांच्या कुटूंबियांसाठी मदत
या सर्वसाधारणसभेत सभासदांच्या मुलांनी 10वी व 12 वी व इतर स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन कौतुक करण्यात आले. तसेच उच्च पद भूषविणारे व निवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टी.डी.एफ.चे धुळे जिल्हाध्यक्ष संजय पवार,पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर उगले, व्हा.चेअरमन विशाल आखजमल, सेक्रेटरी राजेंद्र कलाल, संचालक दिलीप पाटील, भरत मराठे, शिवाजी बाविस्कर, गणेश चव्हाण, सुरेश जाधव, किशोर बच्छाव, उदयकुमार वळवी, सुनिता राठोड, पद्मावती पटेल, सजन मोती, किरण पाटील किरण काळे आदी उपस्थित होते. पुढे गटनेते शिंदे म्हणाले की, आपल्या पतसंस्थेला सतत ’अ ’वर्ग मिळला आहे. ही एकमेव संस्था आहे की. शंभर टक्का वसूली आहे. 21 शे सभासद मधून फक्त 22 सभासद थकबाकीदार आहेत ही आपल्या पतसंस्थेची अभिमानाची बाब आहे. सभासदांच्या मुल -मुलींचा विवाहासाठी, अ‍ॅक्सीडंट, नैसर्गिक मृत्यु व इतर आजारांसाठी आर्थिक मदत केली जाते. सभेमध्ये एकूण 10 विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार शिवाजी बाविस्कर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले