जळगाव। अमृतमधून मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची मानसिकता सत्ताधारी यांची नसल्याचा आरोप भाजप सदस्या उज्वला बेंडाळे यांन आज सभागृहात केला. न्यायप्रविष्ठ विषय असल्याचे सांगत सभापती यांनी तडका फडकी सभा संपल्याचे जाहीर केले. अंदाजपत्रकाची सभा संपल्यानतंर दुसरी स्थायी समितीची सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत 14 विषयांना मंजूरी देण्यात आली. या सभेत आरोग्य व अग्निशमन विभागावरुन चर्चा झाली.
अभिकोष व सांख्यिकी विभागात तपासणी
सभापती खडके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. जळगावातील शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणीपुरवठा करायला तिन टँकर महीनाभरासाठी घेण्याच्या विषावरुन व्यवस्थित माहीती न दिल्याने आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी उज्वला बेंडाळे यांनी 1महीन्याच्या स्वच्छतेने काम होणार का? असे विचारल्यावर डॉ. पाटील यांनी हगणदारीमुक्तीची समिती तपासणीसाठी येणार असल्याचे सांगीतले. यावर बेंडाळे यांनी मग केवळ तपासणी पुरतीच स्वच्छता करायाची का ? असा टोला लगावला. तसेच टँकर लावण्यापेक्षा सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी नळ जोडणी किंवा बोरींग करयाची सूचना मांडली. यानतंर पुथ्वीराज सोनवणे यांनी अग्निशमन निधीच्या प्रस्तावाची माहीती पुढील महासभेत ठेवण्याचे सांगीतले.
मालकीबाबत कोर्टात जाणार
जिल्हाधिकारी यांनी महात्मा फुले व सेन्ट्रल फुले कार्मेटच्या जागेच्या प्रयोजनात बदल करुन महापालिकेने अटी शर्तींचा भंग केल्याने जागा शासनजमा का करुन नये अशी नोटीस दिली आहे. याविरोधात कोर्टात जाण्यासाठी महापौर व आयुक्तांना प्राधिकृत करणे व खर्चास मान्यता देण्याचा आयत्यावेळच्या ठरावास मान्यता देण्यात आली. तसेच सभेत 14 विषयांना मंजूरी देण्यात आली. या सभेत आरोग्य व अग्निशमन विभागावरुन चर्चा झाली.