समजूत काढण्यासाठी जयंत पाटील, अजित पवारांच्या भेटीला !

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी तातडीने सुनावणी घेण्यात येत आहे. थोड्याच वेळात याबाबत सुनावणी होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नवनियुक्त गटनेते जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. आमचे सर्व आमदार एकत्र असून फक्त अजित पवार हे दूर राहू नये यासाठी मी अजित पवारांच्या भेटीला जातो आहे आणि त्यांची मनधरणी करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

५४ पैकी जवळपास सर्वच आमदार आमच्याकडे परत आले आहे, मात्र एकटे अजित पवार दूर राहू नये यासाठी आम्ही अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी ‘कोशिश करने वालो की कभी हार नही होती’ असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते जयंत पाटील यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या कार्यालयाला नियुक्तीचे पत्र सोपविले. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. राष्ट्रपती राजवट उठवून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर शिवसेनेसह राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांनी केले आहे. सुनावणीसाठी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहे. कॉंग्रेसतर्फे कपिल सिब्बल तर सरकारकडून सॉलीसीटर जनरल तुषार मेहता कोर्टात भूमिका मांडणार आहे.