समता नगरातून देशी दारू जप्त

0

जळगाव । महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर रामानंद नगर पोलिसांनी पिंप्राळा, समता नगरात धाड टाकून जवळपास 6 हजार 500 रुपयांची दारु जप्त केली आहे. पिंप्राळ्यातील मढी चौकात जितेंद्र गोकुळ सुर्यवंशी हा अवैधरित्या दारु विकत असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पीएसआय रोहीदास ठोंबरे, अतुल पवार, योगेश पवार, सुधाकर शिंदे, अरुण निकुंभ, अनिल फेगडे यांनी मढी चौकात धाड टाकून जितेंद्र सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जवळपास 3 हजार 600 रुपयांच्या टॅग्नो दारुच्या 40 व महाराजाचा दारुच्या 20 बाटल्या मिळून आल्या. त्याच्या ताब्यातून 2 हजार 500 रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली. तसेच रामानंद नगर पोलिसांनी समतानगरातून 900 रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली आहे.