जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना समता नगरातील शिव मंदिर परीसरात घडली. याबाबत तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील समता नगरातील शिवमंदिर परीसरात संजय मधुकर पाटील (42) हे वास्तव्यास आहेत. जून्या भांडणाच्या कारणावरुन बुधवार, 15 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भावड्या दुबल्या करोसिया, मनिष दुबल्या करोसिया व संजू दुबल्या करोसिया या तिघांनी संजय पाटील यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अजित पाटील हे करीत आहे.