पिंपरी-चिंचवड : समता भ्रातृ मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला सकाळी साडेआठ वाजता झेंडावंदन, सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा दरम्यान स्वच्छता अभियान व वृक्षारोपण, रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान दहीहंडी उत्सव तसेच शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम श्रमिक भवन, बजाज गेटसमोर, पुणे-मुंबई जुन्या मार्गावर येथे पार पडणार आहेत.
समाजबांधवांचा सत्कार होणार
समता भ्रातृ मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्टला शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत सभासद पाल्यांसाठी गुणगौरव, सेवानिवृत्त, नवदाम्पत्य, ज्येष्ठ नागरिक, वारकरी, यशस्वी उद्योजक समाजबांधवांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमांना आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, नगरसेवक नामदेव ढाके, प्रा. व. पु. होले, उद्योजक विलास बोरोले, उद्योजिका भारतीताई भारंबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.