इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी इंदापूर येथिल सामाजिक कार्यकर्ते अशोक पोळ यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईतील चेंबूर येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत अशोक पोळ यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहीती संघटनेचे राष्ट्रीय संयोजक राहुल कांबळे यांनी दिली. त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक भंते विरयेज्योती नागपूर यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी अरूण वाघमारे उपस्थित होते.
संघटनेचे राष्ट्रीय सचेतक गुरू चरणसिंग यांच्या आदेशानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. अशोक पोळ यांचा पुणे जिल्ह्यातील सर्व बहुजन वर्गातील दांडगा जनसंपर्क, स्वत:ला झोकून देऊन अन्यायाविरूद्ध लढा देणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला कार्यकर्ता आहे. त्यांची समाजाच्या व संघटनेच्या प्रती काम करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी असल्याने त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.