जळगाव । परप्रांतील अल्पवयीन मुलाला समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला त्याच्या पालकांनाकडे सुपर्द करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश येथील बळरामपूरचा रहिवाशी समसाद अताहर हा पंधरावर्षी मुलगा त्याच्या भावाकडे पुण्याला गेला होता़ मात्र तेथे त्याचे मन न लागल्याने त्याच्या भावाने वडिलांशी संपर्क करुन त्याला गावाकडे येणार्या 3-4 लोकांसोबत रेल्वेत बसवून दिले. मात्र, तो घरी पोहचला नाही. समसादच्या वडिलांना बिना स्टेशनवरून जफर नावाच्या मुलाने समसादची खुशहाली कळविली. यानंतर समसादने सलामतपुर येथून वडिलांना फोनद्वारे उद्या चार वाजेपर्यंत येणार असल्याचे कळविले. वडिलांना चिंता लागल्याने ते लखनऊपर्यंत येऊन पोहचले, अखेरीस बिनापर्यंतही ते आले स्टेशन परिसर पाहिला मात्र कुठेच समसाद सापडला नाही़ यावेळी त्यांच्या वडिलांनी रेल्वे प्रशासनाला सीसीटीव्हीत तपासणीची विनंती केली. मात्र तेथून तो बळरामपूरच्या गाडीत न बसता तो पुन्हा महाराष्ट्राकडे येणार्या रेल्वेत बसला आणि भुसावळ स्थानकावर उतरला. भुसावळ स्थानकावर आठवड्यापासून बेवारस अवस्थेत आणि खालावलेल्या तब्येतीत पडला होता़ अखेरीस समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांनी पुढाकार घेऊन समसादला जिल्हा रुग्णालयात दाखल केले,मात्र त्याची तब्येत ठिक नसल्याने बालगृहाने पुन्हा समतोलकडेच त्याची कस्टडी देऊन तपासणी करुन आणा असे सांगितले़ समसाद हा तब्बल 1 महिना 4 चार दिवस बेपत्ता होता़ समतोल प्रकल्पाने समसादशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यातून त्याच्या घरचा नंबर मिळाला आणि पालकांशी संपर्क साधला़ यानुसार गुरुवारी समसादचे वडिल अताहर अली आणि त्याचा भाऊ त्याला घ्यायला शहरात दाखल झाले.