समर्थकांच्या संतापानंतर हर्ष गोयंकाने घेतले ट्वीट मागे

0

नवी दिल्ली । रायजिंग पुर्ण सुपरजाइंट्सच्या संघाचे मालक यांच्या बंन्धू हर्ष गोयंका यांनी ट्वीट करून धोनीच्या नेतृत्वावर व फलंदाजीवर टीका केली होती.अशा टीकेमुळे धोनीचे समर्थकांकडून (नेटीझन्सकडून) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.धोनीचा अशा प्रकारे केल्या गेलेल्या अपमानाने त्याच्या चाहत्यांनी गोयंका यांच्यावर निशाणा साधला आहे.एका चाहत्याने असे लिहले आहे की, धोनी आहे म्हणून रायजिंग पुर्ण सुपरजाएंट संघाला पाठिंबा मिळत आहे.तो गोयंका यांचा संघ किवा स्मिथ त्याचा कर्णधार आहे म्हणून पुणे संघाला समर्थन मिळत नाही आहे.चुक लक्षात येताच हर्ष गोयंका यांनी ट्वीट डिलीट करून धोनीच्या समर्थनात ट्वीट केले आहे.त्यात धोनीची प्रशंसा केली आहे.

धोनीप्रति तरी आदर व्यक्त करा
हर्ष गोयंकाने ट्वीट करून म्हटले होते की, ‘महेंद्र सिंह धोनीच्या जागी स्टीव स्मिथकडे रायजिंग पुणे सुपरजाएंट संघाचे नेतृत्व सोपविण्याचा आमचा निर्णय खूपच योग्य होता. स्मिथने सिद्ध केले आहे की, जंगल (आयपीएल) चा राजा कोण आहे. आपल्या लाजवाब प्रदर्शनाने त्याने धोनीपेक्षा आपण श्रेष्ट असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर गोयंका यांनी हे ट्विट डिलीट केले. पंरतु माहीच्या चाहत्यांच्या रागातून वाचले नाहीत. आयपीएलच्या दहाव्या सत्राची सुरूवातीलाच पुर्ण संघाच्या मालकाला धोनीच्या चाहत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आयपीएलच्या काही दिवस आधीच संघ व्यवस्थापनाने महेंद्र सिंह धोनीला हटवून स्टीव स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपविले होते. गोयंकाच्या ट्वीटवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे की, हर्ष गोयंका, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, कमीत कमी धोनीप्रति तरी आदर व्यक्त करा.

परदेशी खेळाडूंच्या तुलनेत देशी खेळाडूंचा अपमान करू नका. एका अन्य यूजरने यापेक्षा तिखट प्रतिक्रिया देत ट्वीट केले आहे की, तुम्हाला कशाचे ज्ञान आहे, क्रिकेट सोडा, कशाचेही ज्ञान नसताना तुम्ही उद्योगपती कसे बनलात. आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हर्ष गोयंकाजी आम्ही आरपीएस संघाला तुमच्यामुळे व तुमच्या ’स्मिथी’मुळे पाठिंबा देत नाही तर केवळ महेंद्र सिंह धोनीमुळे देतो. धोनी आमच्यासाठी केवळ एक नाव नाही तर त्याच्याशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.