समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ

0

नारायणगाव :- समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन पातळीवर प्रथमच अशा स्वरूपातील पदवीदान समारंभाचे आयोजन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील परमोच्च क्षण म्हणून याची नोंद होणार असल्याचे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे यांनी सांगितले.

समारंभाच्या आरंभी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा.सचिन शेळके यांनी विद्यापीठाचा ध्वज हाती घेतला होता. या मिरवणुकीत प्रमुख अतिथी,प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे,विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी व सर्व पदवीप्राप्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सभागृहात मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ गीताने समारंभाला सुरुवात करण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्‍वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे, डीन डॉ.दिपराज देशमुख, विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे, प्रा.निर्मल कोठारी, प्रा. महेश शिंपी, प्रा.प्रवीण सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

255 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण
शैक्षणिक क्षेत्रात गेली 38 वर्षे निस्पृहपणे काम करणारी विशेष व्यक्ती डॉ.लक्ष्मण घोलप, ट्रान्सवोल्ट इंजिनिअरिंग प्रा.लि. पिरंगुट, पुणे या कंपनीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिरुद्ध चव्हाण आणि मोरया इंडस्ट्रीज चे मालक मच्छिंद्र घंगाळे आदी मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. महाविद्यालयाने भरीव कामगिरी केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यानी अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी 255 पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.