समर्थ पतसंस्थेकडून सभासदांना नऊ टक्के लाभांश जाहीर

0

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

चिंबळी : चिंबळीफाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. या सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेच्या वतीने सभासदांना सन 2016-17 या वर्षासाठी 9 टक्के लाभांश देण्यात आला. संस्थेचे खजिनदार संतोष गवारे यांनी आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. संस्थेची वाटचाल, आर्थिक स्थिती, ध्येयधोरणे यासंदर्भात सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष शिवाजी गवारे, संस्थेचे खजिनदार संतोष गवारे, अण्णासाहेब मगर बँकेचे व्यवस्थापकक माणिक येळवंडे, श्री नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक अशोक भोकसे, संस्थेच्या उपाध्यक्षा सुरेखा गवारे, संचालक दयानंद येळवंडे, राजू कड, सुधीर मुर्‍हे, संतोष गवारे, नीलेश बोराटे, नितीन येळवंडे, सचिन गवारे, डॉ. सुशील पाटील, नंदा येळवंडे, लखन साळवे, देवीदास मेदनकर, ज्ञानेश्वर ठाकूर, कैलास येळवंडे, शेखर करपे, भरत करपे, चंद्रकांत बधाले, चंद्रकांत फलके, भगवान साकोरे, रोहिदास गवारे, बाबुराव गवारे, काळुराम मुर्‍हे उपस्थित होते.

सभासदांसाठी प्रशिक्षण
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून सभेला सुरुवात झाली. त्यानंतर श्री समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवर सभासदांचे स्वागतगीताच्या माध्यमातून स्वागत केले. संस्थेच्या आर्थिक व सामाजिक कार्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी दिली. यावेळी सर्वांनी संस्थेच्या ठेवी 200 कोटी रुपयांपर्यंत करण्याचे ध्येय स्वीकारले. सभेच्या वेळी महाराष्ट्र राज्य सह. संघाच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षक म्हणून सोनाळकर व लिंबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व्यवस्थापक अमोल गवारे यांनी केले. तर सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक संभाजी गवारे यांनी मानले.