‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकावर बंदी न आणल्यास सेनास्टाईल आंदोलन

0

मुक्ताईनगरात शिवसेनेचा इशारा ; पोलिस निरीक्षकांना निवेदन

मुक्ताईनगर- राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रकाशित झालेल्या शालेय पाठ्यपुस्तकांपैकी डॉ.शुभा साठे लिखीत व नागपूरातील लाखे प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याने याबाबत या पुस्तिकेच्या लेखिका, प्रकाशक व जबाबदार अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, अमरदीप पाटील, प्रफुल्ल पाटील, मुक्तार खान, बबलू वंजारी, दिलीप पाटील, योगेश काळे, मजीद खान, सिध्दार्थ भालेराव, दीपक सोनार, गौरव तळेले व शिवसैनिक उपस्थित होते.