समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्यासाठी 5 लाखाचा निधी

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घोषणा

धुळे: समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्वाचे असून, संस्थेच्या कार्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. समर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड’ या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळताना दिसत आहे. अशा वेळी समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे घेण्यात आलेले प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरतील आणि समर्थ रामदासांच्या साहित्यांतील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखिताविषयी माहिती घेतली. त्यांनी समर्थ वाग्देवता मंदिराच्या या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले.