‘समर्पणाची दुर्वा’ उपक्रमाची आज मुहूर्तमेढ

0

भुसावळ । अंतर्नाद प्रतिष्ठानने यंदा ‘गणरायाला समर्पणाची दुर्वा’ उपक्रम हाती घेतला आहे. त्याची मुहूर्तमेढ भुसावळ हायस्कूलमध्ये शनिवार, 26 रोजी सकाळी 10.30 वाजता शैक्षणिक साहित्य वाटपाने होईल.

गणेशोत्सवात उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हितेंद्र धांडे हे असतील. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक वसंत पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. धरणगावचे साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे हे याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी एका पत्रकान्वये दिली.