समलैंगिक प्रकरणातून एकाची हत्या

0

दिल्ली : आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता नवीन दासच्या मृत्यू संधर्बात मंगळवारी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. चार ऑक्टोंबरच्या रात्री मोर-भोपूरा रस्त्यावर नवीनच्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. माहितीनुसार नवीन दासचे तय्यब नावाच्या व्यक्तिसोबत समलैंगिक संबंध होते. नवीन दास तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाण्यासाठी दबाव टाकत होता. त्याने तय्यबचे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले होते. लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी मान्य केली नाही तर सर्व व्हिडि वायरल करेन अशी धमकी दिली होती. नवीनपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने भाऊ तालीब आणि मित्र समीर खानसोबत मिळून नवीनची हत्या करण्याचा कट रचला.

त्यांनी नवीनला त्याच्या गाडीत जिवंत जाळले. तिन्ही आरोपींनी खूप क्रूर पद्धतीने नवीन दासची हत्या केली. हा फक्त हत्येचा गुन्हा नसून यामध्ये अपहरण आणि लुटीचा सुद्धा समावेश आहे. समलैंगिकांच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.