समस्याग्रस्त भोकरीकरांचा उपोषणाचा इशारा

0

वरखेडी । येथून जवळच असलेल्या भोकरी येथील ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अस्वच्छतेसह, दूषित पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी, खराब रस्ते या सर्व समस्यांनी तोंड वर काढले असून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून या समस्यांचे तत्काळ निवारण करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसू असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.

चारही बाजूला घाणीचे साम्राज्य
गावात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शोचालय नाहीत, गावातील अंतर्गत रस्त्यांची दुराव्यस्था झाली आहे. नवीन वस्तीती रस्ते नाही, जुन्या गटारी जीर्ण झाल्या असून नवीन गटारींचे कामे झाले नसल्याने व काही गटारी तुडुंब भरल्याने त्यांची देखबाल होत नसल्याने गावतील सांड पाणी गल्लीतून वाह जाते, यामुळे डबकेही साचले. तसेच ग्रामपंचायत समोर, आगंवाडी उर्दू शाळा, धर्मिक स्थळांजवळ, मुख्य रस्ताने गावचे प्रवेश द्वार असलेल्या रेल्वे गेटजवळ व गावाचा चारही बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून रोगराईला आमंत्रण मिळत आहे. अस्वच्छ मुळे भोकरीचा बाजार पेठ मधील गुरूवारी लागणार्‍या दुकानीची संख्या कमी झाली आहे.

योजनांचा पैसा पाण्यात
भोकरी या गाव साठी पिण्याच्या पाण्या साठी पेयजल योजने अंतर्गत जवळ-जवळ एक कोटी रुपयांची योजना बहुळा धरणा वरून करण्यात आलेली आहे, परंतु धरणावरती गावासाठी पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीतून दुषित ,दुर्गदीयुक्त पिवळा हिवरा रंगाचा पाणी पुरवठा गावात होत आहे. गावात तीन ठिकाणी पाणीपुरवठा योजना असून सुध्दा दूषित पाणी ग्रामस्थांना मिळत असून ही योजना पूर्णता फसल्याचे चित्र आहे. या योजनेवरील खर्च केलेला अमाप पैसा पाण्यात गेल्याचे आता बोलले जात आहे. 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी येते, तेही दूषित असल्याने हे पाणी गुरे सुध्दा लवकर पित नसताना अशा प्रकारचे पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे त्वचा रोग होण्याचा धोकाही वर्तविण्यात येत आहे.

26 जानेवारीची मुदत
26 जानेवारी पूर्वी गावातील विविध समस्याचे त्वरित निवारण करण्यात येऊन ग्रामस्थांना न्याय देयावे, आशी मागणी निवेदनात करण्यात आली असून वरील मागण्याचा विचार न झाल्यास लोकशाही वशांतेच्या मार्गाने जमियत उल्मा ए हिंद व ग्रामस्थ भोकरी ग्रामपंचायत समोर 26 जानेवारी उपोषणास बसतील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मौलना अरमान इशाअति सदर जमियत उल्मा ,मौलना आकील साहब उपाध्यक्ष जमियत उल्मा ,हफीज अकिल ,हाफीज मुस्तकीम मो.हनीफ, हाफीज कलीमनजीर शाहा, हाफीज सदाम के.के , हाफीज इस्माईल गु.रसूल,हाफीज असलम मुल्लाजि , हाफीज इब्राहीम,हाफीज अनिस, शकीलमोहमद,लुख्मान आमीद,मुख्तार बुलंद, मुसा रज्जाक यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहे.

अधिकार्‍यांना निवेदन
अस्वच्छ गावातील लहान मुलांना व नागरिकांना डेंगू मलेरीया ताप येणे या सारखा लहान मोठ्या आजराना सामोरे जावे लागले. या मुख्य समस्या सह अनेक लहान मोठ्या समस्या असून भोकरी ग्रामस्थ त्यापासून त्रस्त झाले आहे. या विवध समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे म्हणून जमियत उल्मा ए हिंद व ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रा.प.भोकरी आमदार किशोर पाटील, गटविकास अधिकारी, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपुत, प.स.सदस्य ज्ञानेश्‍वर सोनार यांच्या सह संबंधीत अधिकारी यांना निवेदन दिले आहे.