यावलच्या विस्तारीत भागात पालिका पुरवणार सुविधा
यावल- फैजपूर रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या वाढल्या असून विरार नगरासह गृहनिर्माण संस्थेचे साहिल नगर, लोकेश नगर, पटेल कॉलणी, मयुरेश्वर नगर व तडवी कॉलनी भागात गेल्या 12 वर्षांपासून सुविधा नसल्याने नागरीकांनी सोमवारी पालिकेसमोर उपोषण छेडले होते. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी महिनाभरात उपोषण सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
12 वर्षांपासून सोयी-सुविधांचा अभाव
10 ते 12 वर्षांपासून नागरी वस्ती असतानाही या भागाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. पालिकेकडे पिण्याचे पाणी, रस्ते व गटारींकरीता गेल्या काही महिन्यांपासून नागरीक तगादा लावत आहेत शिवाय वारंवार पालिकेस निवेदन देवूनदेखील समस्या सुटत नसल्याने सोमवारी या भागातील नागरीकांनी थेट पालिकेसमोर उपोषण मांडले. सिराज तडवी, मुनाफ तडवी, युनूस तडवी, कादर तडवी, नामदार तडवी, जावेद तडवी, सैय्यद बाबा, सिकंदर तडवी, महेमुद तडवी, दिलीप गजरे, विलास धनगर, दौलत पटेलांसह मोठ्या संख्येने नागरीक उपोषणास बसले. त्यांना विरोधी गटातील नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, शेख असलम, नौशाद तडवी, रूख्माबाई भालेराव-महाजन, देवयानी महाजन आदींनी पाठींबा दर्शवला होता.