वरणगाव । सरकारमध्ये मंत्री जरी शिवसेनेचे असले तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलने केले तरी हरकत नाही. नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच खरे शिवसैनीकांचे कर्त्यव्य आहे. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा गुणधर्म विसरु नका असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले.
भगव्या सप्ताहाला मिळाला प्रतिसाद
शिवसेना पदाधिकार्यांची बैठक जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये भगवा सप्ताह अंतर्गत केलेल्या विविध कामांचा आढावा प्रा. धिरज पाटील यांनी दिला.
योजनांबद्दल जनजागृती
शेतकर्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतीसाठीची अवजारे व साहित्याची खरेदी, मृदा आरोग्य कार्ड (एसएचसी), नीम कोटेडे युरिया, परंपरागत कृषी विकास योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी बाजार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आदी वेगवेगळ्या योजना ह्या विषयी शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती केली जाईल असे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
तसेच वरणगाव शहराची नवीन कार्यकारणी गठित करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांनी दिले. प्रसंगी विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपतालुका प्रमुख नितीन सोनवणे, बाळू माळी, यशवंत बढे, बंडू महाजन, निलेश ठाकूर, गिरीश जैन, अबरार खान, सुशील पाचपांडे, योगीता सोनार, नाना चौधरी, शिवा भोई, रवी सुतार, गोली भोई, भुरा धरने, हर्षल पाटील, सुरेंद्र सोनवणे उपस्थित होते.