रावेर कृषी अधिकारी एस.एस.पवार यांचा प्रताप ; शेतकर्यांना अपशब्द वापरून हाकलुन लावले
रावेर- सर्वानी माझ्या ऑफिस मधून चालते व्हा, समस्या सोडायला, तुमच्या बापाचा मी नोकर नाही अश्या उद्दामपणाने रावेर तालुका कृषी अधिकारी एस.एस.पवार यांनी शेतकर्यांना अपशब्द वापरून हकलुन लावल्याची घटना कृषी कार्यालयात घडली आहे. याबाबत महिती अशी की, आधीच तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळले आहे. शासन मदत तर दुर साध बोलायला सुध्दा तयार नाही. या आधी हे न ते कारण दाखवत सतत चर्चेत असलेले कृषी कार्यालय आज पुन्हा अधिकार्यांच्या बेताल वक्तव्याने चर्चेत आले आहे. सदया तालुक्यात रब्बीची लागवडीसाठी कृषी विभागातुन अनुदान तत्वावर हरभरा गव्हाचे बियानेची परमिटे कृषी कार्यालयात वाटप सुरू आहे. यातूनच गोंधळ उडाल्याने हा सर्व प्रकार घडला आहे.
बियाणांची अशी आहे समस्या
प्रत्येक शेतकरी आपला उतारा घेऊन कृषि कार्यालयात बियाने घेण्यासाठी येत असुन मोठी गर्दी होत आहे बियाने वाटप करणारे कृषि कर्मचारी व शेतकर्यांमध्ये कोणताही समन्वय झाला नाही उतार्यावर असलेल्या हेक्टरी प्रमाणेच त्यानां बियाणे हवे असल्याने आणि कर्मचार्यांकडून व्यवस्थित माहिती न् मिळू शेकल्याने काही शेतकर्यांनी कृषि कार्यालय गाठले आणि तिथे बियाणांची माहिती विचार असतांना कृषी अधिकार्यांचा तोल सुटला यामुळे शेतकर्यांमध्ये संताप आहे.
माहिती विचारल्याने अरेरावीची भाषा
शासन प्रत्येक शेतकर्यांना 7/12 वर तीस किलोची प्रत्येकी एकच बॅग दिली जाताय, परंतु आम्हाला उतारावर असलेल्या हेक्टरी प्रमाणे बॅग मिळावी, अशी मागणी होती. परंतु कृषी कर्मचारी माहीती व्यवस्थित न दिल्याने आम्ही काही शेतकर्यांसह तालुका कृषी कार्यालयात याची माहिती विचारण्यासाठी गेलो, परंतु तिथे आम्हाला हाकलुन लावण्यात आले. याधीच दुष्काळाने त्रस्त असतांना शासनाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.