नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केले आहे. भारत हा प्रकृतीला आईच्या रूपात पाहतो. हा आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांचा सन्मान आहे. या सर्वांचे आयुष्य हे प्रकृती नियमानुसारच सुरू आहे. भारतात महिलेचा सन्मान केला जातो. जी झाडांची निगा राखते. पर्यावरणाच्या समस्येचे गांभीर्य जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ती समस्या संपणार नाही. आम्ही प्रकृतीला सजीव मानले आहे असे
पर्यावरणाच्या बाबतीत भारताच्या संकल्पनेला आज जगानं स्वीकारलं आहे. पण हे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज आमच्या देशात गरिबांची संख्या कमी होत चालली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोक वर येत आहेत. पर्यावरण आणि प्रकृतीवर अतिरिक्त दबाव न टाकताही विकास करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पॅरिस करारातून ज्यावेळी काही विकसित देशांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान बदलावर एक समिती बनवली होती, त्यावेळी त्यांनी पूर्ण सभेला दोन भागांमध्ये विभागले होते.
एक बाजूला पर्यावरणवादी तर दुस-या बाजूला विकासवाले आहेत. पर्यावरणवाद्यांनी प्रकृतीला नुकसान पोहोचवणा-या विकासाला विरोध केला आहे. मोदींनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अँटोनिया गुट्येरेस यांनी कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.