जळगाव। शहराच्या राष्ट्रीय महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून साईटपट्याचे काम सुरु असून लवकरच ते काम नियमानुसार पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळर यांनी जळगाव समांतर कृती समितीने सदस्यांना दिले आहे. महामार्गाच्या साईट पट्याचे काम दर्जाहीन असल्याचे निवेदन कृती समितीच्या वतीने आज देण्यात आले. यावेळी डॉ राधेशाम चौधरी, विनोद देशमुख, गजानन मालपुरे, अनंत जोशी, फारूक शेख, अमित जगताप, रागीब जहागीरदार, अशफाक पिंजारी,सलीम इनामदार, मिर्नाजीम अली, शिवराम पाटील, अमोल कोल्हे, दिलीप तिवारी, मनोज चौधरी, मनजित जागीड, फिरोज शेख, अलफेज पटेल,पियुष दोषी,विराज कावडीया, विनोद सैनी, मुविकोराज कोल्हे, रुपेश ठाकूर, आदींनी जिल्हाधिकार्याची भेट घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यानी विविध आश्वासन दिले आहे.
अपघात कमी होणार
शासनाच्या वतीने साईटपट्याच्या तातडीच्या कामासाठी 10 कोटी रुपये खर्च होणार असून लोकप्रतिनिधीनी कामे योग्य होण्यासाठी पाहणी करण्याची गरज आहे. कोटी पर्यत साईटपट्याचे कामे दिले गेले आहे. यामध्ये किमान शहरालगतचीच कामे होणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेची दक्षता लक्षात घेवून पुढील कामे व्हावीत. यासाठी ठेकेदाराकडून योग्य कामे झाल्यास पुन्हा रस्त्यावर होणारे अपघात कमी होणार आहे. महामार्ग समतोल साईडपट्टी भरली जावी. रोडरोलर च्या सहाय्याने दबाई झाल्यास साईटपट्या भरल्या जाणार आहे.
धरणे आंदोलन मागे
राष्ट्रीय महार्गाच्या साईटपट्याच्या कामाची पाहणी जळगाव कृती समितीच्या केली होती. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये साईटपट्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप केला होता. मोठ्या प्रमाणात मुरूम भलत्याच ठिकाणी पसरविले गेले होते. वाहनाच्या चाकाने टाकलेल्या मुरुमाची दबाई करण्यात येत होती. मुरूम चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर पसरविला गेला होता. यामध्ये अपघात कमी होण्यापेक्षा वाढण्याची अधिक शक्यता होती. या संदर्भात कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्याना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्याचा पवित्र्यात असलेल्या समांतर रस्ते कृती समितीच्या पदाधिकार्याना जिल्हाधिकार्यानी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
कृती समिती ,जिल्हाधिकारी करणार संयुक्त पाहणी
जिल्हाधिकार्यानी दिलेल्या आश्वासना नुसार येत्या आठवड्या भरात समांतर कृती समितीच्या सदस्या सोबत तसेच राष्ट्रीय जीवन प्राधिकरणाचे महामार्गाचे अभियंता जिल्हा पोलीसअधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी संयुक्तरीत्या पाहणी करणार आहे. या संदर्भात पाहणी व तपासणी करून कघी आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल. तसेच केलेले काम पुन्हा ठेकेदाराकडून करू, नागरिकांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यानी दिले आहे.
कृती समितीचे निवेदन
महामार्गावर आहे त्या परिस्थितीचे सर्व्हे करुन त्वरित त्याप्रमाणेच निवीदा तयार करण्यात यावी, म्हणून सरसकट मुरुम पसरविणे नाही तर कोणत्या जागेवर किती प्रमाणात खोल आहे, किती लांबी व रुंदीची साईडपट्टी आहे त्याचे डिटेल मेझरमेंट घेऊन त्याची निविदा काढण्यात यावी. महामार्गालगत आता आवश्यकतेप्रमाणे मुरुम टाकलेला नाही, अत्यंत अल्प प्रमाणात तो पसरविलेला आहे.अत्यंत धोका निर्माण झाला असून तो वाहतुकीला व चालण्यात धोकेदायक झाला आहे. साईड पट्ट्यावर मुरुम पसरवून त्यावर पाणी मारले गेलेले नसल्याने त्यावर रोलींग झालेले नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साईडपट्ट्या भरण्याचे कार्य सुरु असून जिल्हाधिकार्याना त्वरित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचित करण्यासाठी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.