जळगाव। शहरातील समातंर रस्त्यांचा विकास करण्याची मागणी महापौर नितीन लढ्ढा यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून राष्ट्रीय महामार्ग 6 जात असून या महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात रहिवाशी रहात आहेत.22 या रहिवाशांना व्यापार, व्यवसाय, नोकरी, खरेदी आदी कारणांसाठी शहरात येण्यासाठी या महामार्गाशिवाय पर्यांय नाही. महामार्गांवरील कायम रहदारी व वाहतूकीमुळे मागील काळात अनेक अपघात होऊन बरेच नागरिक जखमी झाले आहेत तर अनके नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या महामार्गाच्या लगत समांतर रस्ते विकसित करावे तसेच उड्डाणपुल उभारण्यात यावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
महामार्ग चौपदरीकरणच्या भूमीपुजन प्रसंगी केली होती घोषणा
शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचे भूमीपुजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली होती. त्यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते विकसित करणे व महामार्गांवर उड्डाणपुलाचे बांधकाम करणेस मान्यता देऊन जाहीर घोषणा केली होती. या घोषणेनुसार कालींकामाता चौक ते मनपा हद्द नशिराबाद साईट 3 किमी, कालींमाता चौक ते शिवकॉलनी ओव्हरब्रीज (मानराज हायवे) 5 किमी, मानराज पार्क ते बांभोरी हद्दीपर्यंत 4 किमी अशा तिन टप्प्यांत समांतर रस्ते विकसित करण्याचा प्रस्तावित आहे. यासंदर्भांत महापालिकेने प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्यप्राधिकरण, धुळे यांच्याशी पत्रव्यवहार करून डीपीआर व इस्टिमेट तयार केलेला आहे. या महामार्गांवर शहर हद्दीत अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, शिवकॉलनी चौक, कालींकामाता चौक या सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी क्रासिंग महामार्गाची वाहतूक सुरक्षित होऊन रहदारीस व पादचारी यांना अडथळा व अडसर होणार नाही या दृष्टीकोनातून उड्डाणपुलाचे बांधकाम करणे सुद्धा आवश्यक व काळाची गरज असून या कामांनासुद्धा जळगाव भेटीत श्री. गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती आवश्यक असलेल्या समांतर रस्त्यांच्या विकास करण्यासाठी जातीने लक्ष देऊन संबंधीतांना निर्देष देऊन उपकृत करावी असे म्हटले आहे.