मुंबई। भारतामधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) व आय-लीग या दोन संघटनामध्ये विलीनीकरणासाठी चर्चा सुरू आहे. लीगमध्ये 15 ते 20 संघाची लीग खेळाडूंसाठी फायद्याची आहे.कोणताही खेळाडू त्याला विरोध करणार नाही. असे नाही झाल्यास दोन लीग समांतर खेळविण्याचा पर्याय योग्य आहे. यामुळे जास्तीत जास्त फुटबॉलपटूंना रोजगार मिळेल.असे मत छेत्रीने व्यक्त करून त्याने या चर्चाच्या फेर्यामध्ये उडी घेतली आहे.
बेरोजगारीचा प्रश्न सुटेल -छेत्री
समांतर लीगबाबत तो म्हणाला, “आयएसएल आणि आय-लीग यामधून निवड करणे खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरेल; परंतु यातून एक चांगली गोष्ट घडेल आणि ती म्हणजे दोन्ही लीगमध्ये एकाच वेळी प्रत्येकी दहा संघ खेळतील. म्हणजेच एकूण 20 संघ एकाच वेळी खेळतील आणि त्यातून अनेक खेळाडूंना संधी मिळेल. लीग वेगवेगळ्या कालावधीत खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे आयएसएलमधील खेळाडू आय-लीगमध्ये खेळू शकतात. उर्वरित खेळाडूंना संधी मिळत नाही. या लीग समांतर खेळवण्यात आल्या, तर एका लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्याने त्यांचा बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल.”
सुनील छेत्री रॅम्पवॉक
मैदानावर आक्रमक, पण मैदानाबाहेर तितकाच लाजरा असलेल्या सुनील छेत्रीने बॉलीवूडच्या ‘आता माझी सटकली..’ या गाण्यावर रॅम्पवॉक करून सर्वाना सुखद धक्का दिला. त्याच्या महाराष्ट्रीय पेहरावानेही वाहवा मिळवली. भारताकडून सर्वाधिक 53 गोल्स करणार्या छेत्रीला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. एएफसी चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविणार्या बेंगळूरु एफसी क्लबचाही विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.