समाजकंटकांविरोधात नागरिकांचा मूकमोर्चा

0

साक्री । तालुक्यातील दहिवेल गावात दुकाने बंद ठेवून झालेल्या घटनांचा निषेध मुकमोर्चा काढून करण्यात आला. जुन्या बसस्टँडपासून मुकमोर्चा काढून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसिलदार के. डी. मोरे यांना मागण्यांचे निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ नागरिक डॉ. एस. आर. मराठे, एकनाथ गुरव, अमोल सोनवणे, वसंतराव बच्छाव, मनोहर बच्छाव आदी उपस्थित होते. जुन्या बसस्थनाकापासून मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी गावात शुकशुकाट दिसून आली. या मोर्चांत व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चांत सहभाग घेतला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पीएसआय डी. जी. पाटील, नरेंद्रसिंह कचवा यांच्यासह धुळे पोलीस पथकाने बंदोबस्त चोख ठेवला. या मोर्चांमध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. एस. आर. मराठे यांनी आमचा लढा कोणत्याही जाती धर्मा विरोधात नूसन काही समाज कंटकांनी केलेल्या प्रकरणाविरोधात मोर्चा आहे. त्यांच्यावर कठोर कारवई व्हावी यासाठी आमचा मुकमोर्चा व रास्तारोको आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.