समाजकल्याण विभागातर्फे अनुदानाचे वाटप

0

जळगाव । आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे आर्थिक मदत देण्यात येते. आंतरजातीय विवाहासोबतच दिव्यांग बांधवांना देखील अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणार्‍या व दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागातर्फे प्रोत्साहनपर दिल्या जाणार्‍या अनुदानाचे सोमवारी 12 रोजी वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणार्‍या 126 जोडप्यांना अनुदान देण्यात आले. त्यात 124 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तर 2 जोडप्यांना प्रत्येकी 15 हजाराचे अनुदान देण्यात आले. 20147-17 साठी समाजकल्याण विभागाकडे 86 लाख 16 हजाराचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी लाभार्थी न मिळाल्याने 24 लाख निंधी अद्यापही अखर्चीत आहे. सुदृढ व्यक्तिने अपंगाशी लग्न केल्यास प्रत्येकी 50 हजाराचे अनुदान देण्यात येते. यावर्षीच्या 30 जोडप्यांना 49 हजार पाचशे रुपयाचे अनुदान देण्यात आले असून अनुदानातील पन्नास टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा ठेवा म्हणून राहणार आहे.

मासिक बैठक: समाजकल्याण समितीची मासिक बैठक सोमवारी घेण्यात आली.अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती प्रवर्गासाठी सेस फंडातून राखीव असलेल्या 20 टक्के निधींला प्रशासकीय मान्यता व खर्चास मंजुरींचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. 3 कोटी 11 लाख 29 हजाराचा निधी 20 टक्के अंतर्गत तर दिव्यांगाच्या कल्याणासाठी 3 टक्के निधी राखीव असतो. 3 टक्के अंतर्गत 1 कोटी 34 लाखाचा अनुदानास मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. यावेळी सभापती प्रभाकर सोनवणे, समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

बोदडे यांनी मागितले इतिवृत्त
समाज कल्याण समिती सदस्य जयपाल बोदडे यांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या नोटीस सोबत मागील सभेचा इतिवृत्ती पाठविण्याची मागणी केली. मागील सभेतील विषयाबाबत माहिती मिळावी यासाठी त्यांनी इतिवृत्ताची मागणी केली. मागील सभेस सदस्य भानुदास गुरचळ उपस्थित नसतांना त्यांना अनुमोदक करण्यात आल्याचे बोदडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत अनागोदी कारभार चालु असल्याचा त्यांनी केला. दहा वर्षापुर्वी आंतरजातीय विवाहाचा अनुदान त्यांनी घेतला होता. यावेळी त्यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

बोटे, तडवी जिल्हा परिषदेत रुजु जळगाव। ग्रामपंचायत प्रशासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी मिनल कुटे यांची बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळे येथील बी.आर.बोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोटे हे सोमवारी 12 रोजी रुजु झाले असून त्यांनी ग्रामपंचायत विभागाचे कामकाज हाती घेतले. मिनल कुटे यांना कार्यमुक्त करण्यात आले असुन त्यांना अद्यापही बदलीचे ठिकाण मिळाले नाही. तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल दुसाने यांची नाशिक येथे नागरी प्रकल्प विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या जागी आर.आर.तडवी रुजु झाले आहे. त्यांनी महिला व बालकल्याण विभागाचे कामकाज हाती घेतले.