समाजकल्याण सभापतींकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुलेंना अभिवादन

0

जळगाव: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेत त्यांच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या जगावर कोरोनाचे सावट असल्याने घरीच राहून बाबासाहेबांची जयंती साजरी करा, हीच खरी आदरांजली ठरेल असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, डॉ.बी.आर.नरवाडे, समाजकल्याण सभापती यांचे स्वीय सहायक अनिल सुरळकर आदी उपस्थित होते.