समाजकार्य महाविद्यालयातर्फे कोठार येथे वृक्षारोपण

0

तळोदा। येथील समाजकार्य महाविद्यालयांच्या वतीने तालुक्यातील कोठार या गावात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. समाजकार्य महाविद्यालयाच्या क्षेत्रभेट उपक्रमाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून कोठार येथे पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला गावातून जनजागृती रैली काढण्यात आली. यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमात कोठार येथील आश्रमशाळेतील व जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्यांनी देखील उस्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाला कोठारच्या सरपंच विमल पाडवी, ग्राम पंचायत सदस्य रुपसिंग नाईक,एकलव्य युवा मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल पाडवी,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अश्विनकुमार वसावे,अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील,रंजना कदम, वनविभागाचे कर्मचारी साहेबराव मराठे आदी मान्यवर उपस्थीत होते.मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते गावात ठीकठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले.