समाजकार्य महाविद्यालयातर्फे कोठार येथे वृक्षरोपण

0

तळोदा । येथील समाजकार्य महाविद्यालयांच्यावतीने तालुक्यातील कोठार या गावात वृक्षारोपण करण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या क्षेत्रभेट उपक्रमाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून कोठार येथे पर्यावरण संवर्धनसाठी व पर्यावरण जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातून जनजागृती रैली काढण्यात आली. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या या उपक्रमात कोठार येथील आश्रमशाळेतील व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

याप्रसंगी कोठारच्या सरपंचा विमलताई पाडवी,ग्राम पंचायत सदस्य रुपसिंग नाईक,एकलव्य युवा मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल पाडवी,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अश्विनकुमार वसावे,अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील,रंजना कदम, वनविभागाचे कर्मचारी साहेबराव मराठे आदी मान्यवर उपस्थीत होते.मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते गावात ठीकठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना वृक्षारोपणाच महत्व सांगितले व लावण्यात आलेल्या वृक्षच्या संवर्धनासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थी व विद्यार्थिनी मेहनत घेतली.