समाजकार्य व पत्रकारिता अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत सुरु असलेल्या एमएसडब्ल्यु (समाजकार्य) अभ्यासक्रमाची 23 जुन रोजी आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी सदर अभ्यासक्रमासाठी पात्र असून 22 जून पर्यत विभागात अर्ज सादर करावयाचे आहे.

विभागाशी सपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात एम.ए.(एम.सी.जे.) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षेच 11 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया, जनसंपर्क, जाहिरात, न्यू मिडिया क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या युवकांना सुवर्ण संधी उपलब्ध आहे. 9 जुलै पर्यंत पत्रकारिता विभागात नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी विभागाशी अथवा संकेतस्थावर संपर्क साधावे असे आवाहन विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड व डॉ.सुधीर भटकर यांनी केले आहे.