समाजप्रबोधनात्मक डिजिटल बॅनर लावून प्रारंभ

0

नवापूर । शहरातील महात्मा गांधी पुतळा भाग डिजीटल बॅनरमय करण्याचा मानस परिसरातील व्यापारींनी केलेला असून रोपे लावणे,परिसर स्वच्छ ठेवणे,डिजीटल बॅनर आदी कामे लोकसहभागातुन करण्यात आली आहे. रस्ता दुभाजकवर वृक्षारोपण, प्लास्टिक हटाव, दुनिया बचाव, व्यसनमुक्ती,पाणी वाचवा, शिक्षण, पर्यावरण बचाव,पोलीओ डोस रस्ता सुरक्षा आदी समाजप्रबोधनात्मक डिजिटल बॅनर लावून प्रारंभ झाला.

पुतळा परिसर होणार संपूर्ण डिजीटल
नगराध्यक्षा रेणुका गावीत, अय्युब बलेसरिया, विपिनभाई चोखावाला, अजय पाटील संजय देसाई, संजय मिस्त्री, मनोज प्रजापत, फारूक मॅकेनिक, मंगेश येवले, प्राचार्य मिलिंद वाघ, संजय जाधव, हेमंत शहा, मिलींद भामरे, जितु अहिरे, अ‍ॅड नितीन देसाई,हेमंत पाटील, सुभाष कुंभार, ईलामजी वसावे आदी उपस्थित होते. वृक्षारोपण व संगोपन करण्याची जबाबदारी परिसरातील व्यापार्‍यानी घेतली आहे. नगरपालिकेने रस्ता दुभाजक केला असुन परिसरातील व्यापारींनी तो डिजीटल करून सुशोभित करण्याचा या कार्यातून नक्कीच इतरांना प्रेरणा देणारा ठरला आहे.