समाजमंदिरासाठी 7 लाखांचा निधी

0

पुणे । नवीन समाज मंदिर उभारणीसाठी निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता 5 ऐवजी 7 लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच समाजमंदिराच्या दुरुस्तीच्या निधीतही वाढ करण्यात आली असून त्यासाठी 1 ऐवजी 2 लाखांचा निधी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये समाज मंदिर दुरुस्ती, नवीन समाज मंदिराची उभारणी, महिला बचत गटांना शेवई यंत्र, पापड मशीन, दलित वस्तीत शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर देणे, त्याचबरोबर बचत गटांना शेळ्या-मेंढ्या पुरवणे, विजेचे दिवे बसवणे आदी साहित्य पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.