जळगाव- जम्मुकश्मीर मधील कठुआ येथील 8 वर्षीय बालीकेवर झालेल्या पाशवी बलात्कारातून करण्यात आलेली हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या पित्याची हत्या करण्यात आली, दरम्यान या दोेन अमानविय घटनांच्या निषेधार्त समाजवादी पक्षातर्फे रविवारी 15 रोजी सायंकाळी 7.00 वा. सागर पार्क येथुन काव्यरत्नावली चौकपर्यंत कँडल मोर्चचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध सामाजीक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते. दरम्यान याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व लोकांनी आपल्या भावना व्यक्त करत या घटनांचा निषेध करण्यात आला. तसेच घटनांमधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व पिडीतांना लवकरांत लवकर न्याय मिळण्यासाठी या घटनांचे सर्व खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी यावेळी सर्वांनुमतेकरण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कँडल मार्चाला यावेळी समाजवादीचे कार्यकारीअध्यक्ष मीर नाझीम अली,कोर कमिटी अध्यक्ष साजीद शेख, प्रदेशसचिव अहमद हुसैन, महानगर अध्यक्ष मिर नाझिम ैली, उपाध्यक्ष फाईम पटेल, मनसे अध्यक्ष जमील देशपांडे, जैन स्पोर्टसचे फारुख शेख, विराज कावडीया, प्रतिभाताई शिरसाठ, निवेदिती थाटे, प्रतिभा शिंदे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण, गनी मेनन व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.