जळगाव । समाजवादी पार्टीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी रागीब अहमद अब्दुल नबी तर महानगराध्यक्ष अशफाक पिंजारी यांची नुकतीच मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अबु आसीम आझमी यांनी नियुक्तीपत्र देवून निवड केली आहे. 2012 वर्षापासून जळगाव जिल्ह्यात समाजवादी पार्टीने पाय रोवून लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूकीत उमेदवार देवून निवडणूक लढविली होती.
सुशिक्षीत व युवा उमेदवारांना प्राधान्य देणार : रागीब अहमद यांची माहिती
आगामी होणार्या जळगाव महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तथा पक्ष संघटनेसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात होणार्या निवडणूकांमध्ये सर्वसमभाव अशी धारणा पक्षाची राहणार असून सर्व जाती व धर्माच्या लोकांना समाजवादी पार्टीच्या वतीने उमेदवारी देवून स्वःबळावर लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रागीब अहमद यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली. जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष व युवाअध्यक्ष हे सुशिक्षीत उमेदवार घेणार असून या माध्यमातून शेतकरी, अल्पसंख्यांक व दलित समाज बांधवांवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष यांनी दोघांची नियुक्ती केली आहे. 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत मुंबई व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकारीणी जाहीर करुन या दोघांसह महानगर युथ सेनापदी सैय्यद दानीश यांची निवड करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.