समाजवादी पार्टीतर्फे टिपू सुल्तान जयंतीनिमित्त सभा

0

जळगाव । समाजवादी पार्टी,जिल्हा व महानगरतर्फे मेहरुण येथील शेरा चौकात थोर स्वातंत्र्य सेनानी टिपू सुल्तान यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मालेगाव येथील मौलाना जमाल आरीफ तर प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी विचारवंत प्रा.देवेंद्र इंगळे हे होते.यावेळी सपा कोअर कमिटी चेअरमन साजीद शेख,बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मुकुंद सपकाळे, सपा जिल्हाध्यक्ष रागीब अहमद,महानगराध्यक्ष अशफाक पिंजारी, कार्याध्यक्ष मीर नाझीम अली,महासचिव रईस बागवान,जिल्हा उपाध्यक्ष रफीयोद्दीन खान उपस्थित होते. हाफीज उमर फारूक यांनी कुराण पठाण केले. हम्द व नात हाफिज़ शफीक यांनी तर तराना-ए-टिपू मुबीन रहेबर यांनी म्हटले.

जिल्हाध्यक्ष रागीब अहमद यांनी टिपू सुल्तान जयंती साजरी करण्याच्या हेतू कथन करून त्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख वक्ते प्रा.देवेंद्र इंगळे यांनी टिपू हे मूळचे भारतीय राजे होते,ते एक शूर व लढवय्या योद्धा होते.त्याकाळात इतर राजा-महाराजा इंग्रजांबरोबर तह व करार करत होते तर टिपू परकीय इंग्रजी आक्रमणासमोर जोरकसपणे लढा देत होते. त्यांतच त्यांना वीरमरण आले.ते खर्‍या अर्थाने एक महान देशप्रेमी राजा होते. सांगून टिपूच्या इतिहासावर अधिक प्रकाश टाकला. मौलाना जमाल आरीफ म्हणाले की,टिपू सुल्तानचा इतिहास जाज्वल्य असून प्रेरणादायी आहे.खरे म्हणजे टिपू हा धर्मनिरपेक्ष,प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राजा होता. त्यांनी त्यांच्या राजवटीत अनेक मंदिरे-मठ यांना देणग्या व जागिर्‍या दिल्या. सूत्रसंचालन शिबान अहमद व आभार अशफाक पिंजारी यांनी मानले.