समाजवादी पार्टी आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविणार

0

जळगाव । आगामी महपालिका निवडणूकीत जास्तीत जास्त जागा लढविण्याचा निर्धार समाजवादी पार्टींचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी आजमी यांनी व्यक्त केला. ते अजिंठा विश्रमागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सैेय्यद मोईन, प्रदेश सचिव अब्दल रौऊफ, कोअर कमिटी चेअरमन सजीद शेख, जिल्हाध्यक्ष रागीब अहमद, महानगराध्यक्ष सलीम इनामदार, महानगर कार्यकारी अध्यक्ष मिर नझीम, प्रदेश अध्यक्ष अहमद हुसेन आदी उपस्थित होते.

नवीन संविधान लिहीण्याची तयारी
आज न्यायसुध्दा धर्मानुसार होत आहे. चार वर्षांपासून मोदी सरकार आले असून या सरकारकडून संविधान मानले जात नसून आणि नवीन संविधान लिहिण्याची तयारी सुरू आहे. आज समाजातील गरीब, दलित असो की मुसलमान, एसी, एसटी यांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. 1947 साली देशाची फाळणीच्या वेळी जी परिस्थिती होती ती आज निर्माण झाली आहे

मुलभूत सुविधा नाही
सफाई अभियान चालु असून पंतप्रधान ट्रक भरून कचरा मागवतात नंतर तो साफ करतात असा आरोप आ. आझमींनी केला. लोकांचे आर्युमान हे 60 ते 70 वर्ष असतांना अल्पसंख्यांक भागात घाण, आजार, हॉस्पीटल नसणे यामुळे तेथील वयोमर्यादा घटली आहे. याच प्रमाणे जळगाव शहरात मुस्लीमबहुल भागात सफाई होत नाही. याभागात पोलीस स्टेशन बनविले जाईल मात्र, कोणतीही शाळा, हॉस्पीटल सुरू केले जात नासल्याचा आरोप त्यांनी केला.

मनपा शाळांची गुणवत्ता वाढविणार
जळगाव शहरात रस्त्याचा मुख्य प्रश्‍न असून सर्व्हीस रोड असला तरी तो लहान असल्याने प्रत्येक आठवड्यात अपघात होवून तरूणांचा बळी जात आहे. प्रत्येक वेळी सर्व्हीस रोड बनविला जाईल असे सांगितले जाते. महापालिका शाळेंची गुणवत्ता वाढवली पाहिजे. मनपा दवाखान्यात एक रूपयांत औषधी मिळायला हवी, रस्ते, स्लम एरियाचा विकास करू असे सां धर्मनिरेपक्ष समविचारी पक्षांसोबत मनपा निवडणूकीत युती करण्याची तयारी दर्शवत 40 ते 45 जागा लढविण्याचा निर्धार आ. आझमी यांनी व्यक्त केला. देशातील असमानता नष्ट झाली पाहिजे अशी समाजवादी पार्टींची भूमिका असल्याचे आ. आझमी यांनी सांगितले. देश धर्मानुसार नाहीतर विकासावर चालला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. आंबेडकर यांनी बनविलेला कायदा वाचला पाहिजे.

मुस्लिम विरोधात वातावरण
महाराष्ट्रातच नाही तर देशात कायदा व सुव्यवस्था संपूर्ण देशात कोलमडली असून औरंगाबाद येथील जाळपोळीच्या घटनेत केवळ मुस्लीमांना अटक करण्यात आली आहे. हे सरकार जाणून बुजून मुस्लिमांविरोधात वातावरण तयार करत आहे. काम करत नसून देशात विकासाचे कार्य थांबले आहे.बर्बादी शिवाय काहीच नाही आणि असे इश्यु आणून ते निवडणूक लढवू पहात आहेत. देश धर्मानुसार नाहीतर विकासावर चालला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.