जळगाव: समाजवादी पार्टी जळगावतर्फे मुस्लिम ईदगाह क़ब्रस्थानचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकाचे स्वागत ईदगाह कार्यालयवर करण्यात आले. सर्व प्रथम जिल्हा अध्यक्ष मुफ़्ती हारून नदवी यांनी समाजवादी पक्षाची भूमिका मांडून सर्व निवड झालेल्या विश्वस्तना शुभेच्या देऊन आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे अभिवचन दिले.
समाजवादी चे पदाधिकारी नईम मनियार,सलीम इनामदार,रईस बागवान,फहीम पटेल,इद्रीस शेख,अशफाक पिंजारी,कासिम उमर, राशिद खान,राजू शेख,वसीम खान,रिजवान फलाही,निसार शेख,सैय्यद अलीम,जावेद शेख यांनी प्रत्येक नवनियुक्त विश्वस्त यांना बुके देऊन सत्कार केला. मुफ़्ती हारून यांनी गफ्फार मालिक चे, अशफाक पिंजारी व रईस बागवान यांनी फ़ारूक़ शेख चे शाल व बुके देऊन सत्कार केला
ट्रस्ट तर्फे जनरल सेक्रेटरी फ़ारूक़ शेख यांनी सत्कारला उत्तर दिले व सर्व समाजा चे सहकार्याची अपेक्षा व्यक्त करुन आभार मानले
अशफाक पिंजारी यांनी सूत्र संचालन केले.