पुणे : नववीच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र या विषयासाठी पर्याय म्हणून, व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम घेता येणार आहे. त्याबरोबरच भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या निर्णयावरदेखील शिक्कामोर्तब झाला आहे. या बाबतचे परिपत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यंदापासूनच नववीच्या विद्यार्थ्यांना इतिहास नागरीकशास्त्र, भूगोल या विषयांऐवजी मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स ऑटोमोबाईल सर्व्हिस, टेक्निशन, आरोग्य, सौंदर्य, शारीरीक शिक्षण, पर्यटन, शेती, माध्यम मनोरंजन असे विविध दहा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेता येणार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फक्त द्वितीय, तृतीय भाषा पर्याय म्हणून व्यवसाय अभ्यासक्रम घेऊ शकतात. तर इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फक्त समाजशास्त्र विषयाऐवजी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी आहे. त्याच शाळेतील विद्यार्थी विषय घेऊ शकतात.