चाळीसगाव। विधानसभेत कायदे बनतात त्या सभागृहात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे आमदार आवाज उठवीत नाही. समाजासाठी मोठी शोकांतिका असल्याचे खंत व्यक्त करुन समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाजाच्या आमदारांनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन मराठा क्रांती मार्चाचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक रवी काळे-पाटील यांनी केले. शनिवारी 29 रोजी चाळीसगाव येथे मराठा क्रांती मोर्चा संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडावर कार्यालय उभारण्यात आले आहे. प्रास्ताविक महानंदा डेअरीचे सचालक प्रमोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रुपेश पाटील, आभार गणेश पवार यांनी केले.
समाजाचा विकास खुंटला
समन्वयक प्रा.डी.डी.बच्छाव यांनी, मराठा समाजाच्या विद्यार्थी शेतकरी महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे, मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असून प्रस्थापितांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याने समाजाचा विकास खुंटला असल्याचे सांगितले. व्यासपीठावरविलास पाटील, दीपक सूर्यवंशी, शेषराव पाटील, चित्रसेन पाटील, गणेश पवार, दिनेश पाटील, संभाजी पाटील, कल्याण पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, भैय्यासाहेब पाटील, श्याम देशमुख, प्रदीप आहिरराव, छोटू पाटील, अजय पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब सोमवंशी, आप्प्पा पाटील, दीपक पाटील, सुनील पाटील, देवेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, खुशाल पाटील, निलेश निकम, रवींद्रशिनकर, पि एन पाटील, विनायक मांडोळे, संजीव पाटील, अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे, पंकज पाटील, अनिल कोल्हे, निवृत्ती कवडे, स्वप्नील गायकवाड, सुरेंद्र महाजन, छोटू पाटील, अनिल शिरसाठ, पप्पू मिस्तरी, विजय देशमुख, सचिन फुलवारी, आप्पासाहेब पाटील, निंबा पाटील, ऋषिकेश पाटील, सागर चौधरी, आशिष भावसार, मनीष सैंदाणे, बंडू पगार, छगन पाटील आदी समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
क्रांतीदिनी मुंबईत मोर्चा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील दोषी आरोपीना कठोर शिक्षा व्हावी, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोग लागु करावा, अट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतकर्यांचे सपुर्ण कर्ज माफ करावे, मुबंई येथे शिवस्मारक उभारावे, इ.बी.सी सवलतीत वाढ करून 10 लाखाची मर्यादा करावी, या मराठा समाजाच्या प्रमुख सात मागण्यासाठी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित क्रांतीदिनी 9 ऑगस्टरोजी भव्य क्रांतीमोर्चात समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.